मुंबई - अभिनेत्री गौहर खानने काही दिवसांपूर्वी मुंबई ते दिल्ली प्रवास केला होता. मुंबईत केलेल्या कोरोना चाचणीत ती पॉझिटिव्ह निघाली तर दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये केलेल्या चाचणीत निगेटिव्ह. आता प्रश्न हा होता की कुठला रिपोर्ट ग्राह्य धरायचा? मुंबई महापालिकेनुसार एकदाही कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर विलगीकरण अनिवार्य आहे. परंतु गौहर खान विलगीकरणाच्या काळात घराबाहेर पडून चक्क शूटिंग करत होती हे कळल्यावर तिच्याविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात इन्फेक्शियस डिझीसेस ऍक्ट तोडल्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला.
इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट समजली ती म्हणजे सेलिब्रिटीजचे वागणे कसे असावे वा असू नये. जेव्हा मोठमोठे सुपरस्टार्स, रणबीर कपूर, वरुण धवन, अर्जुन कपूर, राकुल प्रीत सिंग, नीतू कपूर .इ., कोरोनाची लागण झाल्यावर, कुठल्याही तक्रारीविना, स्व-विलगीकरणात राहतात तेव्हा गौहर खानने असे बेजबाबदारपणे वागणे न्याय्य आहे का? याची दाखल ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने सुद्धा घेतली असून त्यांनी याबद्दल खेद व्यक्त केलाय. ही संस्था, ज्यात फिल्म इंडस्ट्रीतील सर्व स्तरातील सदस्य आहेत, आपल्या सदस्यांच्या समस्यांची काळजी घेत असते व तंटे-बखेडे सोडवत असते. तसेच ही संस्था शुटिंगचे नियम पाळले जाताहेत की नाही यावरही लक्ष ठेऊन असते.
जेव्हा ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) ला गौहर खानच्या कोरोना पॉझिटिव्ह असूनही शूटिंग करण्याच्या प्रकाराबद्दल कळल्यावर त्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत असेही कळविले की नियम उल्लंघन करणाऱ्या त्या अभिनेत्रीवर दोन महिन्यांची शूटिंग-बंदी घालण्यात येत आहे. याची सूचना सर्व संबंधित संस्थांना कळविण्यात येणार असून त्याचे उल्लंघन झाल्यास इतर संबंधितांवर देखील कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. गौहरने अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. महापालिकेने हातावर विलगीकरणाचा ‘शिक्का’ मारूनही ती निर्धास्तपणे फिरत होती हा निव्वळ बेजबाबदारपणा आहे. तिने स्वतःसोबत इतरांचा जीवही धोक्यात घातला हे निंदनीय आहे. आता तिचे विलगीकरण संपल्यावर तिला आणि संबंधितांना कमिटीसमोर पाचारण करून त्यांची बाजू ऐकली जाईल.
परंतु गौहर खानच्या टीमने सर्व आरोपांचे खंडन केले आहे. गौहर न्यायप्रिय व्यक्ती असून तिने कुठलेही गैरकानूनी काम केले नसल्याचा दावा केला गेला आहे. दहा दिवसांपूर्वीच गौहरच्या पिताश्रींचा स्वर्गवास झाला असून ती अतीव दुःखात आहे आणि अफवा पसरवून त्यात कृपया वृद्धी करू नये ही विनंती केली गेली आहे. असेही कळविण्यात आहे की गौहर मुंबई महापालिकेला पूणतः सहयोग करीत असून स्व-विलगीकरणात आहे.
अभिनेत्री गौहर खानवर दोन महिन्यांसाठी शूटिंग-बॅन! - गौहर खानचा बेजबाबदारपणा
अभिनेत्री गौहर खानने मुंबईत केलेल्या कोरोना चाचणीत ती पॉझिटिव्ह निघाली तर दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये केलेल्या चाचणीत निगेटिव्ह. आता प्रश्न हा होता की कुठला रिपोर्ट ग्राह्य धरायचा? मुंबई महापालिकेनुसार एकदाही कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर विलगीकरण अनिवार्य आहे. परंतु गौहर खान विलगीकरणाच्या काळात घराबाहेर पडून चक्क शूटिंग करत होती हे कळल्यावर तिच्याविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात इन्फेक्शियस डिझीसेस ऍक्ट तोडल्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला.
गौहर खान