मुंबई - अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने गुरुवारी सांगितले की तिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. शिल्पा शिरोडकर 'हम' आणि 'खुदा गवाह' सारख्या चित्रपटात झळकली आहे. शिल्पाने गोविंदा आणि चंकी पांडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ब्लॉकबस्टर आँखें चित्रपटमध्येही मुख्य भूमिका साकारली होती.
अभिनेत्रीने 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया अकाऊंटवर सांगितले की, तिला चार दिवसांपूर्वी संसर्ग झाल्याचे आढळले होते.
शिल्पा शिरोडकर ही अँटी-कोविड-19 लस मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय सेलिब्रिटींपैकी एक होती. ती तिच्या कुटुंबासह दुबईत राहते आणि या वर्षी जानेवारीमध्ये तिने चीनची 'सिनोफॉर्म' लस घेतली होती.