मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मंगळवारी तिच्या 'सुखी' नावाच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली. पोस्टर पाहता हा चित्रपट एक महिला-केंद्रित चित्रपट असल्याचे दिसते आहे. या चित्रपटात शिल्पा मुख्य भूमिकेत आहे. 'सुखी' शिल्पासाठी खास आहे, कारण १९९३ मध्ये 'बाजीगर'मधून पदार्पण केल्यापासून हा तिचा पहिला महिला-केंद्रित चित्रपट असेल.
तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शिल्पाने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, "थोडी बेधडक सी हूं मैं, मेरी जिंदगी है खुली किताब, दुनिया बेशरम कहती है तो क्या, किसी से कम नहीं हैं मेरे ख्वाब! माझ्या आगामी चित्रपटाची घोषणा करताना खूप आनंद झाला आहे. सुखी."
अबंडंटिया एंटरटेनमेंटचे संस्थापक विक्रम हे 'शेरनी', 'शकुंतला देवी' सारख्या सशक्त स्त्री-केंद्रित चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखले जातात. आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन सोनल जोशी करणार आहे, ज्यांनी यापूर्वी 'धूम 3' आणि 'जब हॅरी मेट सेजल' यासारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
शिल्पाने अलीकडेच विनोदी-ड्रामा 'हंगामा 2' द्वारे अनेक वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले होते. शिल्पा सध्या दिग्गज अभिनेते किरण खेर, रॅपर बादशाह आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यासोबत इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये जज म्हणून दिसत आहे.
हेही वाचा -‘८ दोन ७५’ मधील शुभंकर तावडेने पटकावले चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार!