मुंबई- मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला वडापाव हमखास आवडतो असे म्हटले जाते. अगदी क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडूलकरही वडपाववर ताव मारताना मागेपुढे पाहात नाही. अशात आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी वडापावच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर वडापाव खात असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
हेही वाचा - चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवालाच्या घरी एनसीबीचे छापे; ड्रग्ज जप्त
शिल्पाने आपल्या व्हिडिओला मजेशीर कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलंय, ''चलते चलते देखा वडापाव, मनने बोला संडे है, खाव खाव खाव.''
हेही वाचा - 'लक्ष्मी' चित्रपटाचे तृतीयपंथीयांसाठी दिल्लीत स्पेशल स्क्रिनिंग; लक्ष्मी नारायण त्रिपाठींची उपस्थिती
व्हिडिओमध्ये शिल्पा वडापाववर ताव मारताना दिसत आहे. कर्जतहून परतत असताना तिला एका ठिकाणी वडापाव दिसला. तिच्यासोबत पती राज कुंद्राही होते. त्यांनीच शिल्पाचा हा व्हिडिओ शूट केलाय. डायटबद्दल सजग असलेल्या शिल्पाला वडापाव खाताना पाहून इंडस्ट्रीतील कुणालाही आश्चर्य वाटू शकेल.