महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

"हॉलिवूडची मोठी ऑफर नाकारली होती", वाचा शिल्पा शेट्टीचा दावा - शिल्पा शेट्टीचे बॉलिवूड पुनरागमन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेली 14 वर्षे बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहे. आता हंगामा 2 या चित्रपटातून ती पुन्हा रुपेरी पडद्यावर परणार आहे. ती बिग ब्रदर या ब्रिटीश टीव्ही शोची विजेतीदेखील आहे. त्यामुळे तिला हॉलिवूडच्याही ऑफर आल्या होत्या. परंतु या ऑफर तिने का नाकारल्या याचा खुलासा तिने केला आहे.

Shilpa Shetty
शिल्पा शेट्टीचा दावा

By

Published : Jul 14, 2021, 9:34 PM IST

मुंबई- गेली 14 वर्षापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेल्या शिल्पा शेट्टी हिला अगदी हॉलिवूडच्याही ऑफर आल्या होत्या. मात्र तिला हे करायचे नव्हते असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. अनुराग बसू यांचा 'लाईफ इन मेट्रो' आणि धर्मेंद्र यांची भूमिका असलेला 'अपने' हे शिल्पा शेट्टीचे 2007 मध्ये आलेले अखेरचे चित्रपट होते. त्याच वर्षी तिने ब्रिटीश रिएलिटी शो 'बिग ब्रदर' केवळ गाजवला नाही तर ती शोची विजेती ठरली होती. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा शिल्पाकडे लागल्या होत्या. ती हॉलिवूडमध्ये झळकणार अशी अटकळ सर्वच जण लावत होते.

त्यानंतर शिल्पाने बॉलिवूड चित्रपटापासूनही स्वतःला दूर ठेवले. 'ओम शांती ओम' आणि 'दोस्ताना' या चित्रपटात ती पाहुणी कलाकार म्हणून झळकली होती हा अपवाद सोडला तरी ती नायिका म्हणून पडद्यावर अवतरलीच नाही. इतकेच नाही तर या काळात आलेली हॉलिवूडची ऑफरही तिने धुडकावली. त्यानंतर शिल्पा 'नच बलिये' आणि अलिकडचा 'सुपर डान्सर' या शोचे परिक्षक म्हणून काम करताना दिसली.

हॉलिवूड चित्रपट नाकारण्यामागे अमेरिकेत जाऊन राहणे तिला पसंत नव्हते असे ती म्हणते. "माझा मुलगा माझ्यावर खूप रागावला होता कारण मला हॉलिवूडमध्येही एक मोठी ऑफर मिळाली होती, पण मी नाही असे सांगितेल. मुंबईचा मुक्काम हलवणे आणि लॉस एंजेलिसला स्थायिक होणे हे खायचे काम नव्हते.'', असे शिल्फा शेट्टीने मुलाखतीत सांगितले.

एक मोठी संधी गमावली याची जाणीव असलेली शिल्पा सध्या हिंदी सिनेमासाठी पुन्हा काम करीत आहे. आपल्या मुलांच्या विशिष्ट वयानंतर तिला संधी मिळाल्यास ती दुसर्‍या बाजूने विचार करेल असे तिला वाटते.

"मला जे पाहिजे आहे त्याबद्दल मी स्पष्ट आहे. मला येथे काम करणे आवडते. ही एक मोठी संधी गमावली आहे, परंतु माझ्याकडे जे काही आहे त्यामुळे मी खूप खूष आहे. माझ्या कुटुंबापासून दूर राहून मला अशी संधी घ्यायची नव्हती.'', असे शिल्पा म्हणाली. ''माझी मुले 15 वर्षांची झाल्यानंतर मी या गोष्टीचा विचार करु शकेन'', असे शिल्पा पुढे म्हणाला.

शिल्पा शेट्टी ही 'हंगामा 2' या चित्रपटातूनरुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित हा चित्रपट 23 जुलैला डिस्ने + हॉटस्टार वर रिलीज होईल.

हेही वाचा - आमिर खान प्रॉडक्शनने केले लडाखच्या आरोपांचे 'जोरदार खंडन'

ABOUT THE AUTHOR

...view details