मुंबई- अभिनेत्री शिल्पा शेट्टीने शुक्रवारी आपल्या चाहत्यांना आवाहन केले होते की 'हंगामा' हा तिचा रिलीज होणारा चित्रपट पाहावा. पती राज कुंद्राला झालेल्या अटकेचा परिणाम 'हंगामा'च्या रिलीजवर होऊ देऊ नका, असे तिने म्हटले होते. नवरा पॉर्न फिल्मच्या निर्मितीमध्ये अटकेत असताना शिल्पाने केलेल्या या आवाहनाचे टर सोशल मीडियावर उडवण्यात आली.
शिल्पाचे 'हंगामा 2' पाहण्यासाठी चाहत्यांना आवाहन
सोशल मीडिया हँडलवर शिल्पाने हंगामा सिनेमाचे पोस्टरशेअर करीत लिहिले, ''आयुष्य जिथे अस्तित्वात आहे ते फक्त सध्याच्या क्षणात आहे, ही मला योगाची शिकवण आहे आणि त्यावर माझा विश्वास आहे. 'हंगामा 2' साठी संपूर्ण टीमने अविरत मेहनत करुन चांगला सिनेमा बनवला आहे...आणि याचा चित्रपटाला कधीही त्रास होऊ नये.''
तिने पुढे लिहिले की, "तेव्हा तुमच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद दिसण्यासाठी आज सर्वांनी 'हंगामा 2' हा चित्रपट पाहावा अशी विनंती चित्रपटात सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या वतीने करते. आभारी आहे..तुमची शिल्पा शेट्टी कुंद्रा."
शिल्पाच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या इरसाल प्रतिक्रिया
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने जेव्हा ही पोस्ट शेअर केली तेव्हा तिला नवऱ्याच्या प्रकरणावरुन प्रचंड ट्रोल करणे सुरू झाले.
''नवरा जेलमध्ये असताना मोठ्या दिमाखात ट्विटरवर सिनेमाचे प्रमोशन करत आहेस.'', असे एका युजरने लिहिले.
''हे सगळे ज्ञान नवरा राज कुंद्राला का पाजत नाहीस? आग लागली नसताना धुर येतो का...क्रिकेट बेटिंग/चिटींग प्रकरण आणि आता हे...एकदा तू म्हणाली होतीस की या स्थानावर पोहोचण्यासाठी दोघांनी खूप संघर्ष केलाय आणि असली जीवनपध्दती एन्जॉय करता...पण आता तुमचे पितळ उघडे पडलेय." असे एका युजरने लिहिलंय.
''अब तुम्हारे पती के न्यूज देखे क्या 'हंगामा 2' ( तुझा 'हंगामा 2' बघू का तुझ्या नवऱ्याच्या बातम्या बघू?'', असेही एकाने लिहिलंय.
पतीच्या अटकेनंतर पहिल्यांदाच सोडले होते शिल्पाने मौन
शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर सोशल मीडियापासून स्वतःला दूरच ठेवले होते. राज कुंद्राला पॉर्न व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर शिल्पाने पहिल्यांदाच आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पुस्ताकातील उतारा पोस्ट केला होता. तिने आपल्या पोस्टमध्ये जेम्स थर्बरच्या उदाहरणाचा दाखला दिला आहे. यात लिहिलंय, "रागामध्ये असताना मागे वळून पाहू नका, किंवा घाबरुन पुढेही पाहू नका, तर जागरुक राहून पाहा."
पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, "ज्यांनी आपले मन दुखावले आहेत अशा लोकांकडे आपण रागाने वळून पाहतो, जे नैराश्य आपण अनुभवलो आहोत, जे दुर्दैव आपण सहन केले. आपण आपल्या नोकर्या गमावण्याची शक्यता आहे याची आम्हाला भीती वाटते. हरवून जाण्याची, आजारपणाचा त्रास किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू याची भिती वाटत राहते. आम्ही ज्या जागी राहण्याची आवश्यकता आहे, ते हेच आहे, आता जे घडत आहे त्यात काय होऊ शकते, त्याला उत्सुकतेने पाहात नाही आहोत, तर पूर्णपणे जागरुक आहे याची पूर्णपणे जाणीव आहे. "
'हंगामा 2' शिल्पाच्या करियरसाठी महत्त्वाचा
'हंगामा 2' या चित्रपटातून शिल्पा शेट्टी बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. मात्र, राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणामुळे तीच्या करिअरला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तब्बल 14 वर्षांनंतर 'हंगामा 2' मधून शिल्पा पुन्हा चित्रपटसृष्टीत परतत आहे. मात्र, आता राज कुंद्रामुळे ती पुन्हा बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे. पॉर्न फिल्मचे शुटिंग करीत असल्याच्या गुन्ह्याखाली राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली आहे. तो पॉर्न व्हिडिओ बनवून अॅपवर अपलोड करीत असे, असा त्याच्यावर आरोप आहे.
हेही वाचा - शिल्पा शेट्टीची दुहेरी परिक्षा... 'हंगामा 2' आज प्रदर्शित तर राज कुंद्राला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी