मुंबई- लुका छुपी चित्रपटाला मिळालेल्या धमाकेदार यशानंतर दिनेश विजय लवकरच आणखी एका चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. नुकतीच या चित्रपटाविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून 'शिद्दत' असं या चित्रपटाचं शीर्षक असणार आहे.
दिनेश विजन यांच्या 'शिद्दत'मध्ये झळकणार हे कलाकार - daina painty
दिनेश विजय यांच्या 'शिद्दत' चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.या चित्रपटात ४ कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
शीर्षकासोबतच चित्रपटाची स्टारकास्टही जाहीर करण्यात आली आहे. यात विकी कौशलचा भाऊ सनी कौशल, राधिका मदन, डायना पेंटी आणि मोहित रैना या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. यात सनीच्या अपोझिट राधिका तर मोहितच्या अपोझिट डायना झळकणार आहे.
कुणाल देशमुख या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत, ज्यांनी याआधी 'जन्नत' आणि 'तुम मिले'सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचं चित्रीकरण पंजाब, लंडन आणि पॅरिसमध्ये होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर २०२० च्या उन्हाळ्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही वृत्त आहे.