बॉलिवूड अभिनेत्री-मॉडेल शिबानी दांडेकर आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. या प्रसंगी तिने तिचा बॉयफ्रेंड फरहान अख्तरला खास सरप्राईज दिले आहे. तर दुसरीकडे, फरहानने आपल्या 'लव्ह लेडी'साठी प्रेमाचा संदेश देऊन तिचे मन जिंकले आहे.
शिबानीने मानेवर गोंदले फरहानचे नाव
शिबानी दांडेकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टेरीमधून फरहान अख्तरला सरप्राईज देणारा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिबानी तिच्या मानेवर लव्ह बॉय फरहानच्या नावाचा टॅटू फ्लॉन्ट केलेला दिसत आहे. तिच्या टॅटूकडे पाहिले तर असे दिसते की तिने हा टॅटू नुकताच गोंदला आहे. कारण टॅटू लाल आणि एकदम फ्रेश वाटत आहे. फरहानसाठी शिबानीने व्यक्त केलेले हे प्रेम सोशलल मीडियावर व्हायरल झाले आहे.
शिबानीने मानेवर गोंदले फरहानचे नाव फरहनाने गर्लफ्रेंड शिबानीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
शिबानी दांडेकरांच्या पोस्टनंतर फरहान अख्तरने शिबानीला तिच्यासोबत रोमँटिक थ्रोबॅक फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच फरहानने आपल्या लव्ह लेडीसाठी एक प्रेमळ संदेश देखील लिहिला आहे. त्याच्या या संदेशावर चाहते खूश झाले आहेत.
लाल हृदयाच्या इमोजीसह फरहानने कॅप्शनमध्ये लिहिले, "अंतःकरणापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा शू...! आय लव्ह यू..!!" फरहानच्या या पोस्टवर अभिनेता हृतिक रोशन आणि फरहानची बहीण आणि दिग्दर्शक झोया अख्तर यांनी शिबानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिबानी आणि फरहान 3 वर्षापासून आहेत प्रेमात
फरहान अख्तर 2018 पासून शिबानी दांडेकरला डेट करत आहे. फरहान-शिबानी यांनी होस्ट केलेल्या 'आय कॅन डू दॅट' या टीव्ही शोच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. दोघेही या सेटवर प्रेमात पडले आणि बऱ्याच काळानंतर सोशल मीडियाद्वारे त्यांनी याला दुजोरा दिला. त्याला आता 3 वर्षे होत आहेत.
हेही वाचा - अमिताभ बच्चन यांचा सुरक्षा रक्षक जितेंद्र शिंदेंची बदली; संपत्तीची होणार चौकशी?