मुंबई- बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे दोघेही लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. कारगील युद्धात आपले अमुल्य योगदान देणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.
सिद्धार्थ आणि कियाराच्या 'शेरशाह' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात - siddharth malhotra
कारगील युद्धात आपले अमुल्य योगदान देणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. 'शेरशाह', असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर करत चित्रीकरणाला सुरूवात झाली असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे.
विष्णु वर्धन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, करण जोहर, हिरू जोहर, अपुर्वा मेहता, शब्बीर बॉक्सवाला, अजय शाह आणि हिमांशू गांधी हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.