मुंबई - अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा हिने जुहू पोलीस स्टेशन गाठले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शर्लिन तिच्या वकिलांसह पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. शर्लिनच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्राने तिच्या कामाचे पैसे अद्याप परत केलेले नाहीत. या कारणास्तव तिला राज कुंद्राविरोधात मुंबई पोलिसात एफआयआर नोंदवायचा आहे.
शर्लिन चोप्रा जुहू पोलीस स्टेशनच्या आत गेली आहे. ती बाहेर येईल आणि माध्यमांशी बोलेल, यासाठी माध्यमकर्मींनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली आहे. ती पोलीस स्टेशनला पोहोचणार असल्याची कल्पना तिच्यावतीने माध्यमांना देण्यात आली होती.
राजच्या वकिलांनी एक निवेदन जारी केले -