महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शेखर कपूर यांनी केला ड्रीम प्रोजेक्ट 'पानी'चा खुलासा - शेखर कपूर यांचा आगामी चित्रपट

ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी त्याच्या 'पानी' या ड्रीम प्रोजेक्टबद्दलचा खुलासा केला. हा चित्रपट ते सुशांतसिंह राजपूतला घेऊन पूर्ण करणार होते. मात्र हा चित्रपट तयार करण्याची त्यांची इच्छा असून याच्या कथेचा थोडक्यात खुलासा त्यांनी केलाय.

Shekhar Kapoor
शेखर कपूर

By

Published : Jul 25, 2020, 7:17 PM IST

मुंबईः चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या दीर्घकाळ चालणार्‍या ड्रीम प्रोजेक्टबद्दल विचार शेअर केले आहेत.

ज्येष्ठ चित्रपट निर्मात्याने ट्विटरवर आपल्या ड्रीम प्रोजेक्ट 'पानी' या कथेविषयी एक खुलासा केला. 12 वर्षांत चित्रपटासाठी केलेले संशोधन फोटोही त्यांनी शेअर केले. ज्यामध्ये एक झोपडपट्टीतील महिला रस्त्यावर मुलाला अंघोळ घालताना दिसते.

शेखर यांनी ट्विटसह लिहिले, "फोटो 12 ​​वर्षांपूर्वी क्लिक केला गेला. पाणी संशोधनाच्या मोठ्या संग्रहाचा एक भाग. चित्रपटाची स्क्रिप्ट भविष्यातील शहराबद्दल आहे, जिथे श्रीमंत लोक सर्व पाणी घेतात. मग ते पाण्याचा राजकीय आणि सामाजिक नियंत्रणाचे शस्त्र म्हणून वापर करतात. आपण सावध न राहिल्यास काय होईल हे सांगणारी ही कहाणी आहे. "

हेही वाचा - संजना सांघीचा कंगनावर पलटवार, म्हणाली...

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याला 'पानी' चित्रपटासाठी साइन केले गेले होते, परंतु चित्रपटाचा प्रकल्प रखडला आहे. दरम्यान, सुशांतचा जूनमध्ये मृत्यू झाला.

अलीकडेच कपूरने ट्विटरवर व्यक्त केले होते की, जर हा चित्रपट बनवता आला तर तो चित्रपट ते सुशांतला समर्पित करतील. त्यांनी लिहिले की, "जर देवाला हवे असेल आणि 'पानी' तयार झाले तर मी ते सुशांतला अर्पण करीन."

ABOUT THE AUTHOR

...view details