महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शत्रुघ्न सिन्हांनी घेतली राहुल गांधींची भेट, काँग्रेस प्रवेश मात्र लांबणीवर - BJP

भाजपचे बंडखोर नेता शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली...६ एप्रिलला त्यांचा कांग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे...पटना साहिबमधूनच निवडणूक लढवण्यावर सिन्हा ठाम आहेत...

शत्रुघ्न सिन्हांनी घेतली राहुल गांधींची भेट

By

Published : Mar 28, 2019, 5:02 PM IST


भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेस प्रवेश लांबणीवर पडला आहे. ६ एप्रिलला त्यांचा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश होईल. पटना साहिबचे खासदार असलेल्या सिन्हा यांनी आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी काही नेतेदेखील हजर होते.

बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंग गोहिल यांनी ट्विटरवरुन ही बातमी दिली आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलंय, खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी राहुल गांधींची भेट घेतली. खामोश न राहता ते सत्य बोलत आहेत. राष्ट्रहितासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचे ठरवले असून खांद्याला खांदा मिळवून काम करायचे ठरवले आहे. ६ एप्रिलला ते अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.

शत्रुघ्न सिन्हांनी म्हटलंय, राहुल गांधींच्या भेटीस निघालोय. माझ्याकडून कोणतीच अडचण नाही. उशीर का होतोय हे तर तेच लोक सांगू शकतील. आपण पटना साहिबमधूनच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

पटना साहिब येथून भाजपने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेद्वारी दिली आहे. २०१४ मध्ये याच जागेतून शत्रुघ्न सिन्हा जिंकले होते. त्यामुळे ही जागा सिन्हांच्यामुळे काँग्रेस पक्षाला मिळू शकते हा राजकीय आडाखा काँग्रेसने बांधला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details