मुंबई- ज्येष्ठ अभिनेता आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी क्रूज ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंद असलेला सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पाठिंबा दिला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या स्पष्ट शैलीत बॉलिवूडचे वर्णन घाबरलेल्या लोकांचा समूह असे केले आहे. यासोबतच शत्रुघ्न सिन्हा यांनी आर्यन खानला पाठिंबा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसारमाध्यमांवर जोरदार निशाणा साधला आहे. शत्रुघ्न म्हणाले की, शाहरुख खानला यावेळी फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे.
फिल्म इंडस्ट्रीत भित्र्या लोकांचा भरणा
अलीकडेच ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेता शत्रुघ्न सिन्हा बॉलिवूडवर भडकले आहेत. आर्यन खानचे वडील आणि शाहरुख खान यांना मदत करण्याची हीच वेळ आहे, पण गोदी मीडियाच्या भीतीमुळे कोणीही पुढे यायला तयार नाही. फिल्म इंडस्ट्रीत भित्र्या लोकांचा भरणा असल्याचे शत्रुघ्न यांनी म्हटलंय.
म्हणून आर्यनला टारगेट केले जात आहे
जेव्हा शत्रुघ्नला विचारण्यात आले की शाहरुख खानला त्याच्या धर्माच्या नावाखाली घेरले जात आहे का, त्यावर ते म्हणाले की आम्ही असे म्हणू शकत नाही की ही आपत्ती धर्मामुळे त्याच्यावर आली आहे. परंतु काही जणांनी या विषयावर बोलणे सुरू केले आहे. तसे बोलणे योग्य नाही, जो कोणी भारतीय आहे तो भारताचा मुलगा आहे आणि घटनेच्या चौकटीत समान हक्कदार आहे. आर्यन खान हा शाहरुखचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर निशाणा साधला जात आहे, असेही शत्रुघ्न म्हणाले.