महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अजय देवगननंतर अक्षय कुमारसोबत झळकणार शरद केळकर, शेअर केला अनुभव - Sharad Kelkar on Akshay Kumar

अभिनेता शरद केळकरने अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल ४' मध्ये लहानशी भूमिका साकारली होती. तर, अजय देवगनसोबत 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर'मध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला होता. या दोघांसोबतचा अनुभव त्याने शेअर केला आहे.

Sharad Kelkar on working with Ajay Devgn, Akshay Kumar
अजय देवगननंतर अक्षय कुमारसोबत झळकणार शरद केळकर, शेअर केला अनुभव

By

Published : Apr 14, 2020, 2:27 PM IST

मुंबई -अभिनेता शरद केळकर काही महिन्यांपूर्वीच अजय देवगनसोबत 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात झळकला होता. तसेच आता तो अक्षय कुमारसोबत 'भूज - द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. या दोघांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी शरदने आपला अनुभव सांगितला आहे.

'अक्षय, अजय यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा अतिशय चांगला होता. संजय दत्तसोबत देखील 'भूज - द प्राईड ऑफ इंडिया' चित्रपटात माझी मोठी भूमिका आहे. त्यामुळे हे सर्व मला माझ्या भावाप्रमाणेच आहेत', असे शरद म्हणाला.

अक्षयसोबत यापूर्वी 'हाऊसफुल ४' चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. यामध्ये माझी छोटी भूमिका असुनही त्यांच्यासोबत मला खूप काही शिकायला मिळाले.

सध्या लॉकडाऊन सुरु असल्यामुळे शरद त्याच्या कुटुंबीयासोबत वेळ घालवत आहे. एरवी चित्रपट, मालिका, वेबसीरिजच्या शूटिंगमुळे कुटुंबाला हवा तसा वेळ देता येत नाही. त्यामुळे आता लॉकडाऊनमध्ये त्यांच्यासोबत भरपूर वेळ घालवता येतो, असेही तो म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details