मुंबई- दोन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत असलेला अभिनेता संजय कपूर आपल्या मुलीसाठी ओव्हरप्रोटेक्टीव्ह वडील म्हणून काम करणार नाही.
संजय अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या 'द लास्ट अवर'सह मनोरंजन क्षेत्रात ओटीटीवर परत आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रमोशनच्यावेळी त्याला मुलगी शनाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल विचारण्यात आले. यावेळी तो म्हणाला की तिला येत असलेल्या अनुभवातून, काम करताना झालेल्या चुकातून ती शिकत राहील.
"तिला खूप काळापासून अभिनेत्री व्हायचं आहे. हे क्षेत्र असे आहे की आपण आपल्या स्वत: च्या अनुभवातून शिकतो. मी तिच्या पाठीशी आहे. प्रामाणिकपणे, मला असं वाटत आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामाच्या चुकातून शिकले पाहिजे. अशा प्रकारे माझा हात पकडून चालण्याऐवजी तिने तिच्या प्रवासाचा आनंद घ्यावा.'', असे संजय कपूर यांनी म्हटले आहे.
'द लास्ट अवर' यावेब सिरीजमध्ये संजय कपूर हा तपास अधिकारी अरुप सिंग ही व्यक्तीरेखा साकारत आहे. सिक्कीम येथे एका रहस्यमय मृत्यूची चौकशी करण्यासाठी गेला आहे.
शनायाने करण जोहरची धर्मा कोर्नेर्स्टोन एजन्सी या टॅलेंट मॅनजमेंट कंपनी जॉईन केली आहे. तिच्यासोबत तृप्ती दिमरी, गुरफाते पीरजादा, धैर्य करवा आणि लक्ष्य लालवानी यांनाही या कंपनीने प्रवेश दिलाय.
शनायाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिने जान्हवी कपूरच्या 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या चित्रपटाच सहाय्यकांपैकी एक म्हणून काम केले आहे आणि बहुचर्चित ‘नेटफ्लिक्स’ मालिकेत ‘फॅबुलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्ह्स’ या मालिकेतही काम केले आहे. ती निर्माता बोनी कपूर आणि ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची भाची असून अभिनेत्री सोनम कपूर, हर्षवर्धन कपूर आणि जान्हवी कपूर यांची चुलत बहीण आहे.
हेही वाचा - टिळा लावते मी 'कुंकवा'चा : सोनालीने लावला नवऱ्याच्या 'कप्पाळीला टिळा'