मुंबई - नुकतेच विकी कौशल आणि कॅटरिना कैफचे लग्न झाले. या लग्नाच्या फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. आता विकीचे वडील शाम कौशल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही यूजर्स म्हणत आहेत की, कॅटरिना कैफ घरात आल्यानंतर हे तर करावंच लागेल, तर काही जण म्हणत आहेत की, कॅटरिना घरात येताच सासऱ्यामध्ये एनर्जी आली.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शाम कौशल दोरीने कसरत करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शाम जिमचे कपडे घालून घाम गाळताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वडील आणि मुलगा त्यांच्या फिटनेसबाबत किती जागरूक आहेत याची खात्री पटली आहे. दोघेही अनेकदा एकत्र जिममध्ये जाताना दिसले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक यूजर्स शाम कौशलचे कौतुकही करत आहेत.