मुंबई: विद्या बालनचा आगामी शकुंतला देवी चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी इंटरनेटवर धडकला आहे. २ मिनिट 47 सेकंदाच्या या ट्रेलरची सुरूवात मोठ्या गर्दीने विद्या बालनच्या कौतुकाने झालेली दिसते. मानवी कंप्यूटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवांची ती भूमिका साकारत आहे.
ट्रेलर जसजशी पुढे जात आहे, तसतसे विद्या व्यावसायिक आघाडीवर गणितज्ञ म्हणून विजय मिळवताना दिसते. जगाने तिची बुद्धिमत्ता आणि अगदी जटिल गणितांचे समीकरण काही मिनिटांत सोडविण्याची क्षमता मान्य केलेली पाहायला मिळते.
तिच्या बुध्दिमत्तेसमोर संगणकही हतबल आहे हे तिने सिध्द केले तेव्हा तिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाची नोंदणी झाली, ही तिच्या आयुष्यातील सर्वातमोठी घटना होती.
या नंतर ट्रेलरमध्ये जिशु सेनगुप्ताची एन्ट्री होती आणि त्याच्या प्रेमात विद्या बालन पडलेली दिसते. यात शकुंतला देवीच्या मुलीची भूमिका दंगल गर्ल सान्या मल्होत्राने केली आहे.