मुंबई- हॉलिवूडच्या 'द लॉयन किंग' या सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत असून शाहरूखने यासाठी सर्वांचे आभार मानले आहेत.
'द लायन किंग'च्या यशावर शाहरूखची प्रतिक्रिया, सहकलाकारांचे मानले आभार - aaryan khan
या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी शाहरूखने मुफासा नावाच्या पात्राला आवाज दिला आहे. तर शाहरूखचा मुलगा आर्यन खानने सिंबा या पात्राला आवाज दिला आहे. सिनेमाने पहिल्या दोन दिवसांतच ३० कोटींचा गल्ला पार केल्याने किंग खानने यावर प्रतिक्रिया देत ट्विट शेअर केलं आहे.

हे ऐकून अतिशय आनंद होत आहे, की अनेक लोक द लायन किंग चित्रपटाचा आनंद घेत आहेत. मी माझ्या सहकलाकारांना आणि मित्रांना धन्यवाद म्हणेल, की त्यांनी हा चित्रपट हिंदीत प्रेक्षकांच्या भेटीला आणला, असे म्हणत शाहरूखने संजय मिश्रा, श्रेयस तळपदे, अर्शद वारसी आणि असरानी यांना टॅग केलं आहे. तर आर्यन आणि माझा आवाज अधिक खास बनवण्यासाठी आभारी आहे, असं शाहरूखने म्हटलं आहे.