महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कामयाब'ची निर्मिती करणार शाहरुख खान, ठरली प्रदर्शनाची तारीख - रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या वतीने फर्स्ट लूक पोस्टर

अभिनेता शाहरुख खान आणि मनिष मुद्रा मिळून 'कामयाब' या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. यात संजय मिश्रा मुख्य भूमिकेत असेल.

Kaamyab
कामयाब

By

Published : Jan 31, 2020, 4:57 PM IST


मुंबई - 'झिरो' चित्रपटानंतर रुपेरी पडद्यापासून दूर गेलेला शाहरुख खान न्या चित्रपटाची निर्मिती करतोय. त्याच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या वतीने चित्रपट निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता संजय मिश्रा यात मुख्य भूमिका करणार आहे. चित्रपटाचे शीर्षक 'कामयाब' असेल.

रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या वतीने फर्स्ट लूक पोस्टर शेअर करण्यात आले आहे. यात प्रमुख भूमिकेत संजय मिश्रा आहे. दीपक डोबिरियाल आणि सारिका सिंह यांच्याही यात महत्त्वाची भूमिका असेल.

शाहरुख खान बराच काळ रुपेरी पडद्यापासून अंतर ठेवून आहे. तो कॅटरिना कैफसोबत 'झीरो' या चित्रपटात शेवटचा दिसला होता. त्यानंतर शाहरुखने स्वतःच्या चित्रपटाची अद्याप घोषणा केलेली नाही. 'कामयाब' चित्रपटात तो भूमिका करीत नसला तरी सिनेमाची निर्मिती करणार आहे.

शाहरुख खान आणि मनिष मुद्रा मिळून 'कामयाब' या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. कामयाब चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून भारत आणि परदेशातील चित्रपट महोत्सवात सिनेमाने वाहवा मिळवली आहे.

'कामयाब' हा चित्रपट ६ मार्च २०२० रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details