मुंबई - दिग्गज कन्नड अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांच्या निधनाने स्वदेस'चे दिग्दर्शक आशुतोष यांना शोक झाला. किशोरी यांनी आशुतोषच्या स्वदेस' या चित्रपटात २००४ मध्ये काम केले होते. यात त्यांनी कावेरी अम्मा ही व्यक्तीरेखा साकारली होती. शाहरुखने त्यांना श्रध्दांजली वाहात त्यांची खूप आठवण येत राहिल असे म्हटलंय.
यांनी ट्विटरवर बुधवारी किशोरी बल्लाळ यांना श्रध्दांजली वाहत २००४ मधील स्वदेशचा एक सीन शेअर केला आहे.
किंग खानने ट्विटमध्ये लिहिलंय, ''त्यांच्या आत्म्याला शांती लाभो..किशोरी अम्मा नेहमी आठवणीत राहतील. खास करुन जेव्हा त्या मला जेव्हा स्मोकिंग करण्यापासून अडवायच्या. अल्लाह त्यांची देखभाल करो.''
किशेरी बल्लाल यांच्या निधनानंतर आशुतोष गोवारीकर यांनीही श्रध्दांजली वाहिली आहे.
आशुतोषने लिहिलंय, ''ह्रदय पिळवटून टाकणारी बातमी. किशोरी बल्लाळ यांच्या जाण्याने खूपदुःखी आहे. किशोरीजी, तुम्ही दयाळू आणि मृदस्वभावामुळे नेहमी ओळखल्या जाल. स्वदेसमधील कावेरी अम्माची भूमिका नेहमी संस्मरणीय. तुमची खूप आठवण येईल.''