मुंबई- बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरूखने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या मुलींची भेट घेतली. नुकताच शाहरूख कोलकाता नाईट राइडर्स आणि किंगस इलेव्हन पंजाब यांचा सामना पाहण्यासाठी कोलकाताला पोहोचला होता. याच वेळी अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या मुलींची भेट घेत शाहरूखने त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत..
भगवान रहम करना ! अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणींसाठी शाहरुखची प्रार्थना - KKR
यांच्यासाठी सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना करा आणि देव त्यांना प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ताकद देवो, असे शाहरूखने कॅप्शनमध्ये म्हटले आहे
यांच्यासाठी सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना करा आणि देव त्यांना प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ताकद देवो, असे शाहरूखने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या सर्वजणी माझ्या बहिणी आहेत आणि आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी त्यांना तुमच्या प्रार्थनांची गरज आहे, असे म्हणत शाहरूखने हे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री दीपिका पदुकोणही लवकरच अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छपाक असे या चित्रपटाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूकही शेअर करण्यात आला होता.