मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या एका सहकाऱ्याचे निधन झाले आहे. शाहरुख आपल्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटला एक मोठा परिवार मानतो. इथे त्याचे अनेक सहकारी काम करत असतात. यातल्याच एकाने जगाचा निरोप घेतला. यामुळे शाहरुखला मोठा धक्का बसला आहे.
याची माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे. त्याने लिहिलं, ''आम्ही सगळ्यांनी अमर्याद स्वप्ने पाहात सिनेमा बनवायला सुरुवात केली होती. अभिजीत हा आमच्या टीमचा मजबूत आणि महत्त्वाचा भाग होता. आम्ही काही बरे केले, काही चुकाही केल्या. परंतु हा विश्वास कायम होता की, या स्थितीतून आपण सहीसलामत बाहेर पडू कारण आमच्या टीममध्ये अभिजीत होता. तुझी खूप आठवण येईल दोस्ता.''