मुंबई - जर्सी या चित्रपटाच्या शूटींगला चंदिगड येथे सुरुवात झाली आहे. शाहिद कपूर यात प्रमुख भूमिका साकारणार आहे. तेलुगुमध्ये गाजलेल्या जर्सी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. याचे दिग्दर्शन मूळ तेलुगु चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले गौतम टीन्नानुरी करीत आहेत. यात शाहिदसोबत मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर यांच्याची महत्त्वाच्या भूमिका आहेत.
जर्सी या तेलुगु चित्रपटाला दक्षिणेत तुफान प्रतिसाद मिळाला होता. एका क्रिकेटरची ही कथा आहे. आपल्या तडाखेबंद फलंदाजीने धुंवाधार खेळी करणाऱ्या या क्रिकेटरच्या जीवनात एक असे वळण येते, की प्रेक्षक स्तब्ध होऊन जातात. जर्सी चित्रपटाला तेलुगुत मिळालेले यश हिंदीतही मिळेल याची खात्री निर्मात्यांना वाटते. शाहिद कपूरने यासाठी मेहनत घ्यायला सुरुवात केलीय. काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळत असतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.