मुंबई - अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत लवकरच नव्या घरात गृहप्रवेश करणार आहेत. सध्या जुहूच्या छोट्या घरात राहणारा शाहिद आता कुटुंब वाढल्यामुळे आलिशान घरात जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत आपले कुटुंब वाढत असल्यामुळे नव्या घरात जाण्याच्या विचारात असल्याचे तो म्हणाला होता. आता जी माहिती हाती आलेय त्यानुसार या वर्षाच्या अखेरीस हे जोडपे नव्या घरात जाणार आहे.
शाहिदचे हे नवे घर सजवण्यात शाहरुखची पत्नी गौरी खान हिचा हातभार आहे. या नव्या घराचे इंटिरियर डिझाईन गौरी करीत आहे.
शाहिदचे हे नवे घर ८००० स्वेअर फुटाचे आहे. ही एक डुप्लेक्स अपार्टमेंट आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत हे घर तयार होईल. शाहिदने आपल्या घरातून शहराचा देखावा पाहायचे स्वप्न पाहिलंय. त्यानुसार ५०० स्वेअर फुटाची बाल्कनी ठेवण्यात आली असून यातून बांद्रा वरळी सी लिंकचा विहंगम नजारा पाहता येणार आहे.
या घराची किंमत ५६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. शाहिद मीराच्या या स्वप्नातील घरात आलिशान गोष्टी असतील. यामध्ये सुसज्ज जीम, स्पा, स्वीमिंग पूल आणि प्रशस्त लिव्हिंग एरिया असेल.
कामाच्या पातळीवर शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.