मुंबई- सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’च्या रिमेकची सर्वांनाच उत्सुकता होती. अशात चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची म्हणजेच 'कबीर सिंग' चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा झाली. शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या कबीर सिंग चित्रपटाचं आता चित्रीकरण पूर्ण झालं आहे.
शाहिद-कियाराच्या 'कबीर सिंग'चं चित्रीकरण पूर्ण, या दिवशी होणार प्रदर्शित - kabir singh
शाहिद आणि कियाराच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी ही आहे की, लवकरच हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
शाहिद आणि कियाराच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी ही आहे की, लवकरच हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. येत्या २१ जूनला हा चित्रपट चित्रपटगृह गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. अर्जून रेड्डी या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे.
तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हेच 'कबीर सिंग' चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. मुंबई आणि दिल्लीमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडलं आहे. यामध्ये शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची शाहिद आणि कियाराचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.