शाहरुख खान आयपीएल मधील टीम खरेदी करणारा पहिला बॉलिवूड स्टार होता. त्याच्यामुळे इतर अनेक स्टार्स या क्रिकेट महोत्सवाशी जुळले गेले. २०१२ मध्ये एसआरकेची टीम ‘कोलकाता नाइट राइडर्स‘ने अजिंक्यपद पटकावले होते. आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) मुळे अनेक देशांमध्ये क्रिकेट लिग्स सुरु झाल्या. आफ्रिकन देशांतील कॅरेबियन प्रीमियर लीग मधील टीम ‘ट्रिनबागो नाइट राइडर्स’चा शाहरुख सह-मालक आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग ट्वेंटी 20 (CPLT20) मधील ट्रिनबागो नाइट राइडर्सचा आजवरचा सर्वात यशस्वी प्रवास आता 'वी आर टीकेआर' या लघुपटातून दर्शविण्यात येणार आहे.
टीकेआर ही चार सीपीएल ट्रॉफी पटकावणारी पहिली टीम असून नाबाद चॅम्पियनशीप सिझन जिंकण्याचा पहिला बहुमानही या टीमने मिळवला आहे. बॉलीवूड किंग शाहरुख खानची चॅम्पियन टीम ट्रिनबागो नाइट रायडर्सने (टीकेआर) नुकताच एक लघुपट प्रदर्शित केला आहे. ‘वुई आर टीकेआर’ हा लघुपट कॅरेबियन प्रीमियर लीग टी-ट्वेन्टी (सीपीएल टी२०) मधील ट्रिनबागो नाईट रायडर्सचा आजवरचा सर्वात यशस्वी प्रवास प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. या लघुपटाच्या माध्यमातून आपल्या प्रवासाची झलक चाहत्यांना देण्याचा टीकेआरचा मानस आहे. या माध्यमातून टीकेआरच्या आतापर्यंतच्या प्रवासातील चढउतार प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.