महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

We Miss You SRK : शाहरुख खान ट्विटरवर ट्रेंड, फॅन्स म्हणतात, "वुइ मिस यू एसआरके" - किंग ऑफ रोमान्स शाहरुख खान

शाहरुख खानने चार महिन्यांनंतर इंस्टाग्रामवर पुनरागमन केले असले तरी किंग खानचे चाहते ट्विटरवर येण्याची मागणी करीत आहेत. शाहरुखचे चाहते ट्विटरवर तो येण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

शाहरुख खान
शाहरुख खान

By

Published : Jan 21, 2022, 6:28 PM IST

मुंबई- बॉलिवूडचा बादशाह किंग खान आणि किंग ऑफ रोमान्स शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख गेल्या तीन वर्षांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही. त्याचबरोबर तो सोशल मीडियापासूनही दूर आहे.

अलीकडेच चार महिन्यांनंतर शाहरुखने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लॉग इन करून एक जाहिरात शेअर केली. त्यानंतर अभिनेत्याने अद्याप ट्विटरवर पुनरागमन केले नाही म्हणून चाहते त्याची ट्विटरवर प्रतीक्षा करीत आहेत. शाहरुखने 23 सप्टेंबर 2021 रोजी ट्विटरवर शेवटचे ट्विट केले होते.

त्यानंतर शाहरुख खान चुकूनही ट्विटर अकाउंट उघडले नाही. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. अलीकडेच शाहरुख खानने इंस्टाग्रामवर पुनरागमन केले आणि आता त्याने ट्विटरवरही पुनरागमन करावे अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.

यासाठी चाहते #We Miss You SRK ट्रेंड करत आहेत. तुझ्याशिवाय बॉलिवूड अपूर्ण असल्याचं ट्विट चाहते करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, "तीन वर्षे झाली कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. शाहरुख सोशल मीडियावरही सक्रिय नाही. त्याने वाढदिवस आणि नवीन वर्षावर कोणतेही ट्विट केले नाही. तुझ्याशिवाय बॉलिवूड बॉलिवूड नाही, आम्ही तुला मिस करतोय शाहरुख."

शाहरुख खान शेवटचा झिरो चित्रपटात अभिनेता म्हणून दिसला होता. शाहरुख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला आणि शाहरुखच्या फिल्मी करिअरवर मोठा प्रश्न निर्माण झाला.

यावर्षी शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या आशा आहेत. जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चमत्कार करू शकला नाही तर शाहरुख चित्रपटसृष्टीत खूप मागे जाईल.

हेही वाचा -Sushant Singh Death Case : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात निष्काळजीपणा झाल्याची राष्ट्रीय मानवधिकार आयोगाकडे तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details