मुंबई - शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्पेनमध्ये 'पठाण' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात गुंतले आहेत. गेल्या आठवड्यात स्टारकास्ट स्पेनला रवाना झाली होती. आता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचे स्पेनमधून शूटिंग करतानाचा फोटो लीक झाला आहे. याआधी शाहरुख खानने आपल्या बहुप्रतिक्षित 'पठाण' या चित्रपटाची घोषणा करून चाहत्यांच्या मनात घर केले होते. शूटिंग सेटवरील लीक झालेल्या फोटोमध्ये शाहरुख खानचा माचो लूक पाहायला मिळत आहे.
'पठाण'च्या सेटवरून लीक झालेल्या शाहरुख खानच्या फोटोबद्दल सांगायचे तर, यात शाहरुख ऑलिव्ह ग्रीन कार्गो पॅन्ट घालून पोज देताना दिसत आहे. सनग्लासेससह शाहरुख खानच्या शर्टलेस लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या लूकमध्ये शाहरुख खान लांब दाट केसांनी त्याचे टेक्स्चर पूर्ण करत आहे. हा फोटो शाहरुख खानच्या फॅन पेजने शेअर केला आहे. त्याचवेळी किंग खानचा हा फोटो चाहत्यांना 'ओम शांती ओम'मधील 'दर्द-ए-डिस्को' आणि 'मनवा लगे' सारख्या गाण्यांची आठवण करून देतो.
याआधी मंगळवारी (१५ मार्च) शाहरुख खानने चाहत्यांना सुखद आनंदाची बातमी दिली होती. त्याने SRK+ हा OTT प्लॅटफॉर्म लाँच करीत असल्याची बातमी चांहत्याना कळवली होती. शाहरुखने ट्विटरवर एक घोषणा पोस्टर शेअर केले, ज्यावर "SRK+, लवकरच येत आहे" असे लिहिले आहे.