मुंबई- हॉलिवूड स्टार टॉम हिडलस्टनने आपण शाहरुखचा फॅन असल्याचे म्हटले होते. त्याने एका खास व्हिडिओमध्ये शाहरुखचे कौतुक केल्यानंतर आता यावर शाहरुख व्यक्त झाला आहे.
डिस्ने + हॉटस्टारच्या अधिकृत यूट्यूब हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये टॉम हिडलस्टन वर्ड असोसिएशनचा गेम खेळताना दिसत आहे. भारताबद्दल सर्वात पहिल्यांदा त्याला काय वाटते असे विचारले असता ब्रिटीश स्टार हिडलस्टन म्हणाला, "शाहरुख खान". जेव्हा "बॉलीवूड" हा शब्द आला तेव्हा त्याने पुन्हा एकदा बॉलिवूड सुपरस्टारचा उल्लेख केला.
या व्हिडिओ क्लिपला उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला की हिडलस्टनने खूप प्रेमाने त्याच्यावर वर्षाव केला. ''तू दयाळू आहेस, गॉड ऑफ मिस्चिफ...आशा आहे की या तुझ्या दाव्याचा गैरवापर होणार नाही.'', असे म्हणत शाहरुखने हिलडल्टनच्या एमसीयूच्या लोकी उर्फ गॉड ऑफ मिस्चिफ या व्यक्तिरेखेचा उल्लेख केला.
अभिनेता हिडलस्टन सध्या डिस्ने प्लसची मालिका 'लोकी'मध्ये मुख्य भूमिकेत आहे, ज्यामध्ये त्याने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स (एमसीयू) कडून 'गॉड ऑफ मिशिफ' या नावाची भूमिका केली आहे. ही मालिका पाहण्यास उत्सुक असल्याचे व पहिल्या एपिसोड पाहात असल्याचे शाहरुखने पुढे म्हटले आहे.
हेही वाचा - पवारांच्या भेटीनंतर प्रशांत किशोर यांनी गाठला शाहरुखचा 'मन्नत' बंगला, चर्चांना उधाण!