मुंबई - टीव्ही जगतातील लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा लोकांना हसवण्याचे उत्तम काम करत आहे. कपिलच्या या शोचा तिसरा सीझनही हिट ठरत आहे. या आठवड्यात कपिलच्या शोमध्ये 'सरदार उधम' चित्रपटाचे दिग्दर्शक शुजित सरकार आणि मुख्य अभिनेता विकी कौशल अतिथी म्हणून दिसणार आहेत. वाहिनीने या शोचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये सुपरस्टार शाहरुख खान हा विकी कौशलवर नाराज असल्याचे दिसतंय.
शाहरुख खान का रुसलाय?
वाहिनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शोचा 25 सेकंदांचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की कॉमेडियन किकू शारदा त्याच्या व्यक्तिरेखेमध्ये अभिनेता विकी कौशलला सांगतो की शाहरुख खानने त्याला सांगितले आहे की विकी कौशलने त्याचा जोश सिनेमा पाहिला नसल्यामुळे तो नाराज आहे. यावर विकी कौशलने याचे कारण विचारले असता किकूने सांगितले की तो वारंवार म्हणत असतो की 'हाउ इज जोश','हाउ इज जोश', हे ऐकताच विकीसह उपस्थित सर्वजण हसायला लागतात.
काय आहे 'जोश'चा मुद्दा?
आपल्याला माहिती असेल की 'जोश' हा शाहरुखची भूमिका असलेला एक चित्रपट होता. तर आदित्य धर दिग्दर्शित 'उरी-द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत होता आणि याच सिनेमातील 'हाउ इज द जोश' हा डायलॉग लोकप्रिय ठरला होता. हा डायलॉग विक्की अनेकवेळा म्हणताना सिनेमात दिसला होता.