महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चित्रपट साईन केल्याच्या वृत्तावर शाहरुखनं सोडलं मौन, शेअर केली पोस्ट - अॅक्शनपट

अनेक माध्यमांमधून असे वृत्त समोर येत होते, की शाहरुखनं दोन नवे चित्रपट साईन केले आहेत, जे पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. यातील एक अॅक्शनपट असून अली अब्बास जफर याचं दिग्दर्शन करणार असल्याचं म्हटलं जात होतं.

शाहरुख खान

By

Published : Sep 8, 2019, 11:11 PM IST

मुंबई- बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान शेवटचा झिरो सिनेमात झळकला. अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ या दोन आघाडीच्या अभिनेत्रींसोबतचा त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. या चित्रपटाच्या अपयशानंतर अद्याप शाहरुखने कोणताही सिनेमा साईन केला नाही.

अनेक माध्यमांमधून असे वृत्त समोर येत होते, की शाहरुखनं दोन नवे चित्रपट साईन केले आहेत, जे पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. यातील एक अॅक्शनपट असून अली अब्बास जफर याचं दिग्दर्शन करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, शाहरुखनं आता हे वृत्त फेटाळलं आहे.

एक ट्विट शेअर करत त्यानं या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. हे जाणून अतिशय छान वाटतं, की माझ्या अनुपस्थितीत आणि पाठीमागे, मी गुप्तपणे असे अनेक चित्रपट साईन केलेत. ज्यांच्याबद्दल मलाही कल्पना नाही. मुलांनो आणि मुलींनो, मी जेव्हा एखादा चित्रपट साईन करेल, तेव्हा मी स्वतः याबद्दल माहिती देईल, असं शाहरुख म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details