मुंबई - शाहरुख खान आणि काजोल यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (डीडीएलजे) चित्रपटाच्या २५व्या वर्धापनदिनानिमित्त हा चित्रपट देशाबाहेर पुन्हा प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट जर्मनी, यूएई, सौदी अरेबिया, कतार, अमेरिका, यूके, कॅनडा, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, नॉर्वे, स्वीडन, स्पेन, स्वित्झर्लंड, एस्टोनिया आणि फिनलँडमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे.
शाहरुख, काजोलचा 'डीडीएलजे' विविध देशांत झाला पुन्हा रिलीज - SRK latest news
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (डीडीएलजे) चित्रपटाच्या २५व्या वर्धापनदिनानिमित्त हा चित्रपट देशाबाहेर पुन्हा प्रदर्शित झाला आहे. यामुळे जगाला पुन्हा एकदा चित्रपट मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची संधी मिळेल,असे वितरक नेल्सन डिसूझा यांनी म्हटले आहे.
![शाहरुख, काजोलचा 'डीडीएलजे' विविध देशांत झाला पुन्हा रिलीज DDLJ' re-released](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9270745-thumbnail-3x2-oo.jpg)
या वृत्ताला दुजोरा देताना आंतरराष्ट्रीय वितरणाचे उपाध्यक्ष नेल्सन डिसूझा म्हणाले, ''चित्रपटाच्या २५व्या वर्धापनदिनानिमित्त आम्ही 'डीडीएलजे' पुन्हा रिलीज करत आहोत याची घोषणा करण्यास आम्हाला आनंद झाला आहे. यामुळे जगाला पुन्हा एकदा चित्रपट मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची संधी मिळेल. "
आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख आणि काजोल व्यतिरिक्त मंदिरा बेदी, अनुपम खेर, अमरीश पुरी, फरीदा जलाल, परमीत सेठी यांच्या मुख्य भूमिका होत्या. २० ऑक्टोबर १९९५रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.