मुंबई - अभिनेत्री शबाना आझमी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सध्या त्या एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यग्र आहेत. अशावेळी त्यांनी केलेले ट्विट बरेच चर्चेत आहे. जावेद अख्तर यांच्यासाठी त्यांनी हे रोमँटिक ट्विट केले आहे.
शबाना आझामी यांनी आपल्या ट्विटमध्ये करण जोहर आणि मनिष मल्होत्रा यांच्यासाठी आवाहनदेखील केलंय आणि पती जावेद यांच्या हलक्या फुलक्या शब्दात कौतुकही केलंय.
त्या लिहितात, ''मी ४० डिग्री तापमानामध्ये शूटींग करीत आहे. इकडे सगळीकडे चिखल आहे. करण जोहर आणि मनिष मल्होत्रा तुम्ही मला इथून बाहेर काढून पिवळी शिफॉन साडी परिधान करुन पर्वतावर का घेऊन जात नाहीत ?'' या ट्विटला रोमँटिक तडका देत त्यांनी पुढे लिहिलंय, "केस पांढरे झालेत म्हणून काय झाले ह्रदय तर काळे आहे...!"
जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची जोडी बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठीत समजली जाते. दोघेही आपआपल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. शबाना सिनेमा आणि रंगमंचावर सक्रिय असतात. आपल्या राजकीय भूमिका त्या नेहमी बोलून दाखवत असतात. दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात.