मुंबई - बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले आहे. त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्दी-खोकल्यासाठी त्या तपासणीसाठी गेल्या असता, त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाईन फ्लू, मुंबईत उपचार सुरू - स्वाईन फ्लू
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले आहे. त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्दी-खोकल्यासाठी त्या तपासणीसाठी गेल्या असता, त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
माझी प्रकृती आता सुधारत आहे. शांतचित्ताने बसण्यासाठी मला वेळ मिळतो आहे. या वेळेचा मी सदुपयोग घेणार, अशी प्रतिक्रिया शबाना यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली आहे. अलिकडेच त्यांनी स्टार स्क्रिन अॅवॉर्ड्स सोहळ्यात हजेरी लावली होती. या सोहळ्यात त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
शबाना आझमी या हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळखल्या जातात. 'अंकुर' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेल्या शबाना यांनी आजवर शेकडो चित्रपटातून दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ‘जुनून’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘कंधार’, ‘स्पर्श’, ‘पार’, ‘सती’, ‘अर्थ’, ‘गॉडमदर’ अशा असंख्य चित्रपटातून त्यांनी संसम्रणीय भूमिका केल्या आहेत. ‘सिटी ऑफ जॉय' आणि ‘मॅडम सोऊसाटस्का' या हॉलिवूड चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला आहे.
अभिनयासोबतच त्यांनी राजकारणातही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला आहे. १९९७ साली त्या राज्यसभेवर निवडून आल्या होत्या.