महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सिद्धार्थ पिठानीला सत्र न्यायालयाचा दिलासा, लग्नासाठी १५ दिवसांचा तात्पुरता जामीन - लग्नासाठी १५ दिवसांचा तात्पुरता जामीन

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आरोपी सिद्धार्थ पिठानीला मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सिद्धार्थ पीठानी ला लग्नासाठी १५ दिवसांचा तात्पुरता जामीन सत्र न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. विवाहानंतर सिद्धार्थ पिठानिला २ जुलैला पुन्हा आत्मसमर्पण करावे लागेल.

Sessions court grants relief to Siddharth Pithani
सिद्धार्थ पिठानीला सत्र न्यायालयाचा दिलासा

By

Published : Jun 18, 2021, 5:44 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आरोपी सिद्धार्थ पिठानीला मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सिद्धार्थ पीठानी ला लग्नासाठी १५ दिवसांचा तात्पुरता जामीन सत्र न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर देत सुटका करण्याचे निर्देश दिले आहे.

कोर्टाच्या आदेशानुसार २६ जूनला सिद्धार्थ पिठनीचा विवाह आहे, त्या आधारावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. विवाहानंतर सिद्धार्थ पिठानिला २ जुलैला पुन्हा आत्मसमर्पण करावे लागेल. सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात सिद्धार्थला हैदराबादहून २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पिठानी हा बर्‍याच दिवसांपासून फरार होता आणि एनसीबीने हैदराबादच्या कार्यालयात संयुक्त कारवाईत त्याला अटक केली होती. त्याच्यावर नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी एनसीबीने सुशांत सिंह राजपूतच्या अंगरक्षक आणि नीरज आणि केशव यापूर्वीच्या मदतीबद्दलही चौकशी केली होती. त्याशिवाय अभिनेत्रीच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने हरीश खान नावाच्या ड्रग पेडलरलाही अटक केली.

अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग्स एंगलची चौकशी करणार्‍या एनसीबीने अंमलबजावणी संचालनालयाकडून म्हणजेच इडी कडून अधिकृतपणे संपर्क साधल्यानंतर चौकशी सुरू केली, ज्यात ड्रग्स वापर, खरेदी, वापर आणि देवाण घेवाण संबंधित विविध गोष्टींचा तपास झाला.

गेल्या वर्षी १४जून २०२०रोजी सुशांतसिंग राजपूत हा त्याच्या मुंबई येथील निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता.

हेही वाचा - नवीन पर्वात आमची जबाबदारी सांभाळून खूप धमाल करू - आर्या आंबेकर

ABOUT THE AUTHOR

...view details