मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणामुळं शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यामध्ये टोकाचा वाद झाल्याचेदेखील समोर येते. अश्लिल सिनेमे तयार करणे आणि ते प्रोड्यूस करणे या प्रकरणात मुंबई क्राइम ब्रँचने व्यावसायिक आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केली आहे. राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा या दोघांची समोरासमोर चौकशी देखील करण्यात आली. ही चौकशी जुहू इथल्या निवासस्थानी झाली . जेव्हा राज कुंद्रा शिल्पा शेट्टी समोर आला त्यावेळेस शिल्पा शेट्टीचा ताबा सुटला. शिल्पा शेट्टी हिच्या अश्रूंचा बांध फुटला ती ढसाढसा रडू लागली आणि राज कुंद्राला प्रश्न विचारू लागली. ''आपल्याला देवाने दिलेले सगळे आहे. समाजामध्ये मान सन्मान आहे. भरपूर पैसेही आहेत. संपत्ती आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगलं नाव आहे. इतके सगळे असताना हे करण्याची गरज काय होती?'', असा प्रश्न शिल्पा शेट्टी हिने विचारला.
पुढे शिल्पा शेट्टी अशी ही म्हणाली की, ''या प्रकरणामुळे आपलं नाव धुळीस मिळाले आहे. अनेकांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. तुझ्या या कृत्यामुळे हातातले काही प्रोजेक्ट्स देखील गेले आहेत.'' असं बोलत शिल्पा रडू लागली.
शिल्पा शेट्टीला क्लीनचिट नाही!