हैदराबाद: अभिनेता वरुण धवन चंदिगडमध्ये आपल्या आगामी ‘जुग जुग जीयो’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कोविड -१९ चा बळी ठरला. सध्या ते मुंबई येथील निवासस्थानी क्वारंटाईन असून तीन फोटो शेअर करीत 'आयुष्यात एकांतात राहून' विनोद शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
वरुणने तीन मजेशीर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यात तो तरुण ते जख्खड म्हातारा दिसण्यापर्यंचे तीन लूक आहेत. किशोर अवस्था, मध्यम वय आणि म्हतारा असे स्वतःचे हे तीन फोटो आहेत.
वरुण धवनने शेअर केला आपल्या म्हतारपणाचा फोटो वरुण धवनने लिहिलंय, "लाइफ इन आयसोलेशन" 👦🏻👱🏻♂️👨🏼🦳"मी वयस्क झालेले पाहण्यासाठी उजवीकडे स्वाईप करा." त्याच्या या फोटोवर तासाभरातच ७ लाख लाईक्स मिळाले आहेत.
वडील डेव्हिड धवन दिग्दर्शित 'कुली नंबर 1' मध्ये वरुण धवन दिसणार आहे. १९९५ मध्ये वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या गोविंदा-करिश्मा कपूरच्या चित्रपटाचा रीमेक आहे. रिमेकमध्ये वरुण आणि सारा अली खान मुख्य भूमिकेतून पुन्हा झळकणार आहेत.
हेही वाचा - वरुण धवन माझा सोबती, त्याच्याबरोबर नाचणे माझे नशीब - सारा अली खान
वरुण चंदिगडमध्ये राज मेहता यांच्या ‘जुग जुग जीओ’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे आणि यावेळी त्याला कोरोनाची बाधा झाली आहे. नीतू कपूर आणि राज मेहता हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. चित्रपटाचे शूटिंग आत्ता थांबविण्यात आले आहे.
हेही वाचा - वरुण धवन म्हणतो, कोरोनाच्या बाबतीत मी अधिक सावध राहायला हवे होते