मुंबई - सनी लिओनने गुरुवारी सोफ्यावर पोज देतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सनी गुलाबी रंगाची पॅन्ट आणि ब्लॅक ट्यूब टॉप असलेले जॅकेट परिधान केलेली दिसत आहे.
तिने आपल्या इनस्टाग्रामवर आपल्या सोफ्यावरील तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ''एक फोटो कोचसोबत''
सनी लवकरच विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘अनामिका’ या अॅक्शन सिरीजद्वारे डिजिटल चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. यासोबतच सनी काही चित्रपटही करीत असून ती ‘शेरो’ आणि ‘द बॅटल विथ भीमा कोरेगाव’ या चित्रपटातही दिसणार आहे.
याबरोबरच रणबीजय सिंगसोबत 'स्प्लिट्सविला' या रिअॅलिटी शोचेदेखील ती होस्ट म्हणून काम करत आहे.
हेही वाचा - गर्लफ्रेंड गॅब्रिएला डीमेट्रिएड्सच्या कपड्यांबाबत अर्जुन रामपालचा गंमतीशीर खुलासा