महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रिचा चड्ढा अन् अक्षय खन्नाच्या 'सेक्शन ३७५'नं पहिल्या दिवशी केली इतकी कमाई - box office clash

चित्रपटाने पहिल्या दिवशी १.४५ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सिनेमाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वर्तवली आहे

'सेक्शन ३७५'नं पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

By

Published : Sep 14, 2019, 3:11 PM IST

मुंबई - बलात्कारासंबधीत कायदा म्हणजे 'सेक्शन ३७५'वर आधारित असलेला सिनेमा 'सेक्शन ३७५' शुक्रवारी प्रदर्शित झाला. या सिनेमात रिचा चड्ढा आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असून हा एक कोर्टरुम ड्रामा आहे. आता या सिनेमाची पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे.

चित्रपटाने पहिल्या दिवशी १.४५ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सिनेमाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वर्तवली आहे. दिग्दर्शक अजय बहल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

या चित्रपटात 'सेक्शन ३७५' संदर्भात वेगवेगळे पैलू अधोरेखित करण्यात आले आहेत. मात्र, याच दिवशी आयुष्मान खुराणाचा ड्रीम गर्लही प्रदर्शित झाल्यानं या सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळाली. यात आयुष्मानने बाजी मारली असून ड्रीम गर्लनं पहिल्याच दिवशी १०.०५ कोटींचा गल्ला जमवाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details