मुंबई- श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मुख्य भूमिका असलेला छिछोरे सिनेमा ३० ऑगस्टला प्रदर्शित झाला. कॉलेज जीवनातील मैत्रीवर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. फर्स्ट विकला या सिनेमाने ६८.८३ कोटींची कमाई केली होती.
दुसऱ्या आठवड्यातही 'छिछोरे'ची डबल डिजीट कमाई, लवकरच गाठणार शतक - chichhore at box office
फर्स्ट विकला या सिनेमाने ६८.८३ कोटींची कमाई केली होती. तर आता दुसऱ्या विकेंडलाही चित्रपटानं चांगला गल्ला जमावला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या आठवड्यातही रविवारच्या दिवशी चित्रपटाने डबल डिजीट कमाई केली आहे.
तर आता दुसऱ्या विकेंडलाही चित्रपटानं चांगला गल्ला जमावला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या आठवड्यातही रविवारच्या दिवशी चित्रपटाने डबल डिजीट कमाई केली आहे. रविवारी या सिनेमाने १०.४७ कोटींचा गल्ला जमवला असून चित्रपटाची एकूण कमाई ९४. ०६ इतकी आहे.
आतापर्यंतची कमाई पाहता हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर शतक गाठेल, यात काही शंका नाही. या आठवड्यात आयुष्मान खुराणाचा ड्रीम गर्लही प्रदर्शित झाल्यामुळे छिछोरेला बॉक्स ऑफिसवर काही प्रमाणात फटका बसला आहे. आता हा चित्रपट आणखी किती गल्ला जमवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.