मुंबई - बॉलिवूड सिंघम म्हणजेच अजय देवगण लवकरच 'दे दे प्यार दे' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजयसोबतच तब्बू आणि रकुल प्रीत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आता या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
'तु मिला तो'! 'दे दे प्यार दे'मधील गाणं प्रदर्शित, अजय-रकुलची रोमँटीक केमिस्ट्री - tabbu
तु मिला तौ हैं ना, असं या गाण्याचं शीर्षक आहे. गाण्यात रकुल आणि अजयची रोमँटिक केमिस्ट्री आणि धमाल मस्ती पाहायला मिळते.
तु मिला तौ हैं ना, असं या गाण्याचं शीर्षक आहे. गाण्यात रकुल आणि अजयची रोमँटिक केमिस्ट्री आणि धमाल मस्ती पाहायला मिळते. या गाण्याला अरिजित सिंगने आपल्या आवाजाने अधिक खास बनवलं आहे. तर कुणाल वर्मा यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि अमाल मलिकने संगीत दिग्दर्शन केले आहे.
पूर्वाश्रमीची पत्नी आणि २४ वर्षांनी लहान गर्लफ्रेंड यांच्यात अडकलेल्या अजयची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अकिव अली यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. तर भूषण कुमार, क्रिशन कुमार, लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.