महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 11, 2019, 5:44 PM IST

ETV Bharat / sitara

दुसऱ्या दिवशी 'जबरिया जोडी'च्या कमाईत वाढ, जमवला इतका गल्ला

पहिल्याच दिवशी या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरूवात पाहायला मिळाली. चित्रपटानं पहिल्या दिवशी ३.१५ कोटींचा गल्ला जमावला होता. तर दुसऱ्या दिवशी या कमाईत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

'जबरिया जोडी'च्या कमाईत वाढ

मुंबई- बिहारच्या पकडवा विवाह पद्धतीवर आधारित 'जबरिया जोडी' सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. 'हसी तो फसी' चित्रपटातील सिद्धार्थ परिणीतीच्या जोडीला मिळालेला प्रतिसाद पाहता हा सिनेमादेखील प्रेक्षकांची मनं जिंकेल असं म्हटलं जात होतं. मात्र, हा अंदाज काहीसा चुकीचा ठरला आहे.

पहिल्याच दिवशी या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात पाहायला मिळाली. चित्रपटानं पहिल्या दिवशी ३.१५ कोटींचा गल्ला जमावला होता. तर दुसऱ्या दिवशी या कमाईत काही प्रमाणात वाढ झाली आहे. शनिवारीच्या सुट्टीमुळे सिनेमाने दुसऱ्या दिवशी ४ कोटींचं कलेक्शन केलं आहे.

'जबरिया जोडी'च्या कमाईत वाढ

सिनेमानं दोन दिवसात ७ कोटींचा गल्ला पार केला आहे. दरम्यान या सिनेमात संजय मिश्रा, जावेद जाफरी, अपाशक्त‍ी खुराणा आणि चंदन रॉय सान्याल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता रविवारी सिनेमा किती गल्ला जमावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.

ABOUT THE AUTHOR

...view details