मुंबई- हॉलिवूडच्या 'द लॉयन किंग' या सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि सिनेमाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसादही दिला. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ११.०६ कोटींचा गल्ला पार केला होता.
'द लायन' बॉक्स ऑफिसवरही 'किंग'; २ दिवसांत पार केला ३० कोटींचा गल्ला
पहिल्याच दिवशी या सिनेमाने ११.०६ कोटींचा गल्ला पार केला होता. आता चित्रपटाची दुसऱ्या दिवशीची कमाईदेखील समोर आली आहे. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चित्रपटातच्या कमाईत जवळजवळ दुपटीनं वाढ झाली आहे.
यानंतर आता चित्रपटाची दुसऱ्या दिवशीची कमाईदेखील समोर आली आहे. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चित्रपटातच्या कमाईत जवळजवळ दुपटीनं वाढ झाली आहे. सिनेमाने दुसऱ्या दिवशी १९.१५ कोटींचा गल्ला जमावला आहे. अवघ्या दोन दिवसांतच सिनेमाची ३०.२१ कोटींची कमाई झाली आहे.
शनिवारच्या सुट्टीनिमित्त अनेकांनी कुटुंबीयांसोबत आणि लहान मुलांसोबत हा सिनेमा पाहण्याचा पर्याय निवडल्याने दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ झाली आहे. तर तिसऱया दिवशीही रविवारच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाच्या कलेक्शनला होणार आहे. हा सिनेमा तेलुगू, तमिळ, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांत भारतातील २१४० स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.