महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'जनभावनेचा आदर करून तरी सुधारित नागरिकत्व कायदा वेळीच मागे घ्या'

केंद्र सरकारने लागू केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला आणि एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी निघालेल्या मुंबईतील मोर्चात वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक आवर्जून उपस्थित राहिले. यात बॉलिवूड सेलिब्रिटीचा सहभाग ही लक्षणीय होता.

Sayani Gupta
सयानी गुप्ता

By

Published : Dec 20, 2019, 8:28 AM IST

मुंबई - पार्च, आर्टिकल 15, फॅन, जॉली एलएलबी2 यासारख्या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सयानी गुप्ता ही देखील आजच्या मोर्चात सहभागी झालेली होती. केंद्र सरकारने लागू केलेल्या या कायद्याची अजिबात गरज नसून त्यामुळे माणसा माणसातील दरी वाढत जाणार आहे. आम्हा सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य मिळालेल असताना ते आमच्या हातून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे हा कायदा ताबडतोब मागे घ्यावा, अशी मागणी तिने केली आहे.

सयानी गुप्ता यांनी सीएए आणि एनआरसीबद्दल आपली मते मांडली

एकीकडे जाचक कायदे लागू करायचे आणि पुन्हा ते मानले नाहीत तर अमानुष लाठीचार्ज करायचा हे अत्यंत चुकीचं असून त्यातून काही एक साध्य होणार नाही. दिल्ली, कोलकाता, ईशान्य भारत या कायद्याच्या अंमलबजावणी पूर्वीच जळतोय. आज संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थी, लोक, संस्था सारे एकवटलेत आणि ते सारे मिळून हा कायदा मागे घ्या, ही एकच मागणी करतायत. त्यामुळे आता तरी जनभवनेचा विचार करून हा कायदा मागे घेण्यात यावा, अशी मागणी अभिनेत्री सयानी गुप्ता हिने केली आहे.

एकूणच या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल तीच म्हणणं जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी..

ABOUT THE AUTHOR

...view details