मुंबई - बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीचे 'मधुबन’ हे ( Sunny Leones new song Madhuban ) गाणे प्रदर्शित झाले आहे. पण या गाण्याला प्रेक्षकांकडून विरोध केला जात आहे. या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. येत्या तीन दिवसांत सनी लिओनीचे मधुबन गाणे यूट्यूबवरून हटवले नाही. तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं. नरोत्तम मिश्रा यांच्या आक्षेपानंतर 'मधुबन' गाण्याचे बोल बदलण्याचा निर्णय म्यूझिक लेबल सारेगामाने घेतला आहे. म्युझिक लेबल सारेगामाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे अधिकृत निवेदन जारी केले आहे.
सनी लिओनीचे ‘मधुबन’ हे गाणे 22 डिसेंबर रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. हे गाणे कनिका कपूरने गायिले असून शरीब आणि तौशी यांनी कम्पोज केले आहे. गाणे प्रदर्शित झाल्याचे स्वत: सनी लिओनीने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होते. यावर तीने त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. अनेकांनी यावेळी सनी लिओनीच्या गाण्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली.
सनी लियोनी बॉलिवडचं ते नाव ज्यासोबत ग्लॅमर आणि वादविवाद नेहमीच जोडले गेले आहेत. मात्र, अशातही सनीने आपले चित्रपट आणि आयटम साँगच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांची मनं जिंकली. 13 मे 1981 ला पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या करणजीत कौरने स्टेजवर येण्याआधी आपलं नाव सनी लियोनी करुन घेतलं. तिने 2012 मध्ये आलेल्या जिस्म 2 चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याआधी ती मोहित सुरीच्या कलयुग सिनेमात झळकणार होती. मात्र, सनीने 1 मिलीयन डॉलर मागितल्याने हा चित्रपट तिला मिळाला नाही. जिस्म 2 सिनेमाआधी सनी बिग बॉस या प्रसिद्ध शोमध्येही सहभागी झाली होती. ज्यानंतर इंटरनेटवर तिला मोठ्या प्रमाणावर सर्च केलं गेलं. तिच्या भूतकाळावरुन जितकी कॉन्ट्रोवर्सी झाली तितकीच तिला प्रसिद्धीही मिळाली.