महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सारा अलीने आई अमृतासोबत दिली अजमेर शरीफ दर्ग्याला भेट

सारा अली खानने तिची आई अमृता सिंगसोबत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा येथे प्रार्थना केली. या स्थळाला भेट दिल्याचा फोटो साराने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे

Sara Ali Khan
सारा अलीने आई अमृतासोबत

By

Published : Feb 26, 2021, 8:03 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने शुक्रवारी अजमेर शरीफ दर्गा येथे नमाज अदा केली. अभिनेत्रीसोबत तिची आई आणि माजी अभिनेत्री अमृता सिंग सोबत पवित्र ठिकाणी आली होती.

साराने सूफी दर्ग्याला दिलेल्या भेटीची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. आईसोबतच्या फोटोला तिने 'जुम्मा मुबारक' असे लिहिले आहे.

दरम्यान, साराने एका मासिकासाठी केलेल्या ताज्या फोटोशूटमुळे इंटरनेटवर वादळ निर्माण केले आहे. मॅगझिनच्या फेब्रुवारीच्या कव्हरमधील फोटोत सारा चमकदार आणि ब्रीझी आउटफिट्समध्ये दिसली आहे.

चित्रपटाच्या पातळीवर विचार करता अलीकडे अभिनेता वरुण धवन सोबत ओटीटी-रिलीज झालेल्या 'कुली नंबर 1' चित्रपटात सारा दिसली होती. तिने आगामी ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, धनुष आणि निमरत कौर यांची मुख्य भूमिका आहेत आणि दिग्दर्शन ए.आनंद एल. राय यांनी केले आहे. अतरंगी रे चित्रपट हिमांशु शर्मा यांनी लिहिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details