मुंबई - अभिनेत्री सारा अली खानने सोमवारी आपल्या 'केदारनाथ' या चित्रपटाचा सहकलाकार दिवंगत सुशांत सिंह राजपूत याची पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आठवण केली. तिने सुशांतचा एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि त्याला अभिवादन केले. मात्र सुशांतच्या चाहत्यांना तिचे हे वागणे बनावट वाटले आणि तिला ट्रोल करण्यात आले.
सोमवारी साराने इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये सुशांत सोबत फोटोला देताना दिसत आहे. "जेव्हा जेव्हा मला मदत, सल्ले किंवा हसण्याची गरज होती तेव्हा तू नेहमीच सोबत होतास. तू मला अभिनयाच्या जगाची ओळख दिलीस, मला विश्वास दिलास की स्वप्ने साकार होऊ शकतात, आणि माझ्याकडे आज जे काही आहे ते मला दिले. तू आमच्या नाहीस यावर विश्वासच बसत नाही. पण जेव्हाही मी ताऱ्यांच्याकडे पाहते, उगवत्या सुर्याकडे किंवा चंद्राकडे पाहते तेव्हा वाटते तू इथेच आहेस.'', असे सारा अलीने सुशांतबद्दल लिहिले आहे.