महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सारा म्हणते, विश्वास बसत नाही कार्तिकच्या बाईकवर बसायला मला पैसे मिळायचे - kartik aaryan

कार्तिकसोबत बाईकवर बसण्यासाठी मला पैसे मिळत होते, यावर विश्वासच बसत नाही. कारण कार्तिकसोबत जाण्यासाठी कोणतीही मुलगी जीव द्यायलाही तयार असते, असं सारा यावेळी म्हणाली.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन

By

Published : Jul 29, 2019, 3:28 PM IST

मुंबई- 'सिंबा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान लवकरच कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याआधी साराने एका चॅट शोमध्ये बोलताना आपल्याला कार्तिकला डेट करण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. अशात आता साराने सेटवरील आपल्या सहकलाकारासोबतच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

नुकतंच तिने दिल्लीत आयोजित एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. तिच्यासोबत याठिकाणी कार्तिक आर्यन आणि भाऊ इब्राहिमनेही हजेरी लावली होती. याच शोनंतर माध्यमांशी बातचीत करताना सारा म्हणाली, इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरील प्रत्येक दिवस माझ्यासाठी खूप खास होता. तिथे केलेली मस्ती मी खूप मिस करत आहे.

यासोबतच तिने कार्तिकसोबतचा आपला अनुभवही सांगितला. कार्तिकसोबत बाईकवर बसण्यासाठी मला पैसे मिळत होते, यावर विश्वासच बसत नाही. कारण कार्तिकसोबत जाण्यासाठी कोणतीही मुलगी जीव द्यायलाही तयार असते, असं सारा यावेळी म्हणाली.

ABOUT THE AUTHOR

...view details