मुंबई- बॉलिवूडची 'चकचक गर्ल' सारा अली खान सध्या काश्मीरमध्ये तिच्या सुट्टीमुळे खूप चर्चेत आहे. तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि काही मित्रांसह ती येथे फिरायला गेली होती. यापूर्वी साराने बर्फ अच्छादित पर्वतांचे सुंदर फोटो शेअर केले होते. आता साराने सोमवारच्या मोटिव्हेशन सेशनमध्ये असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो काश्मीरचे तापमान वाढवत आहे.
साराने सोमवारी तिच्या इन्स्टास्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये पूलमध्ये पोहताना दिसत आहे. हा व्हिडिओ काश्मीरमधील आहे. या व्हिडिओमध्ये साराने उजव्या हाताच्या कोपऱ्यात तापमान देखील दाखवले आहे. मंडे मोटिव्हेशनमध्ये, साराने सांगितले आहे की ती मायनस 2.0 सेल्सिअस तापमानात पूलचा आनंद घेत आहे.
याआधी साराने तिच्या इंस्टाग्रामवर काश्मीरमधील मित्रांसोबत अनेक फोटो शेअर केले होते. यामध्ये त्याचा भाऊ इब्राहिम आणि त्याचे काही मित्रही दिसत होते. यादरम्यान सर्वजण काश्मीरमधील बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसले होते.
हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत साराने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'घर तिथेच आहे, जिथे भाऊ आहे'. फोटोंमधील भावंडांच्या या केमिस्ट्रीवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्स दिले. साराच्या या पोस्टला लाखो लाईक्स मिळाले आहेत.