मुंबई- सध्या चांगलंच चर्चेत असणारं बॉलिवूड कपल सारा अली खान आणि कार्तिक आर्यन अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात. विमानतळावर एकमेकांना सोडायला असो किंवा डिनरला, गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक ठिकाणी ही जोडी एकत्र दिसते. अशात आता सारानं कार्तिकबद्दलचं आपलं मत व्यक्त केलं आहे.
सारानं सांगितला कार्तिकसोबतच्या कामाचा अनुभव, म्हणाली.... - कॉफी विथ करण
ही जोडी लवकरच इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटात एकत्र झळकणार असून या सिनेमाचं चित्रीकरणही पूर्ण झालं आहे. नुकतंच एका मुलाखतीत बोलताना सारा म्हणाली, कार्तिक अतिशय उत्तम अभिनेता आणि सहकलाकार आहे.
ही जोडी लवकरच इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटात एकत्र झळकणार असून या सिनेमाचं चित्रीकरणही पूर्ण झालं आहे. नुकतंच एका मुलाखतीत बोलताना सारा म्हणाली, कार्तिक अतिशय उत्तम अभिनेता आणि सहकलाकार आहे. यासोबतच तो एक विचारशील व्यक्ती आहे. त्याच्यासोबत काम करणं खरंच खूप आनंददायी होतं.
सारा आणि कार्तिकविषयीच्या बातम्यांना सुरुवात झाली, ती साराच्या करणसोबतच्या मुलाखतीमुळे. कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये सारानं आपल्याला कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. यानंतर अनेक ठिकाणी या जोडीला एकत्र स्पॉट केलं जाऊ लागलं.